पाटण्यातील रुग्णालयात धक्कादायक घटना घटली आहे. कोरोनाग्रस्त पती आयसीयूमध्ये उपचार घेत असताना त्याच्या पत्नीचं रुग्णालयातील कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बिहारचे रहिवासी असलेले रोशन आणि त्याची पत्नी हे दोघे नोएडामध्ये राहत होते. रोशन हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, तर मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होता. ९ एप्रिलला त्याला सर्दी ताप आला. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर फुफ्फुस्सात कोरोना संसर्ग झाल्याचे सिटी स्कॅनमधून कळलं. यानंतर त्याच्या पत्नीने रुग्णालयातच पतीसोबत राहायचं ठरवलं.
रुग्णालय कर्मचाऱ्याने रोशनच्या डोळ्यादेखतच त्याच्या पत्नीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयसीयू बेडवर असलेला रोशन काहीच करू शकत नव्हता. यादरम्यान पतीसाठी त्याच्या पत्नीने ज्यादा पैसे मोजून ऑक्सिजन सिलिंडर्स विकत घेतले. पण दुदैवाने रोशनचा मृत्यू झाला. यानंतर रोशनच्या पत्नीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आणि रुग्णालयातील निष्काळजीपणा सर्वांसमोर आणला.
माझ्या बहिणीकडे डॉक्टर आणि स्टाफ वाईट नजरेने पाहायचे. अनेकदा त्यांनी तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असं पिडीतेच्या बहिणीने सांगितलं. एकीकडे पतीची मृत्यूशी झुंज सुरू असताना जे घडत होते, ते अत्यंत संतापदायी होते, अशी प्रतिक्रिया पिडीतेने वृत्तवाहिनीला दिली.
0 Comments