गेवराई तालुक्यातील तलवाडातील राजापूरच्या शेतात एका तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती घातपाताचे व्रण दिसून आले आहेत. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केल्यानंतर फक्त २४ तासांत आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं आहे. संबंधित तरुणाची हत्या अनैतिक संबंधातून झाली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण(वय ३२) असे असून तो गेवराई तालुक्यातील गोळेगावमधील रहिवासी आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरची हत्या ही अनैतिक संबंधातून झाली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार मृत ज्ञानेश्वरला दोन बायका होत्या. त्याच्या पहिल्या बायकोचे म्हणजे नाना आप्पा शिंदे यांच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. परंतु, त्यात ज्ञानेश्वर हा दोघांच्या प्रेमसंबंधात अडचणीचा ठरत होता.
0 Comments