"पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सद्यस्थितीत ऑनलाइन होणार: परीक्षा संचालक गजानन पळसे"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

 कोरोना महामारीची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांचा आरोग्य ठीक राहील त्यांना कोणत्याही प्रकारे कोरोना महामारीचा त्रास होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी घेऊन परीक्षा विभागाने सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्याचे काम सुरू केले आहे.
       
तसेच शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी व इतर निर्बंध विचारात घेता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सद्यस्थितीत योग्य होणार नाही याचा विचार करून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सर्व परीक्षा सद्यस्थितीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
         
सबब ज्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रथम सत्र प्रवेशित विद्यार्थ्यांनी विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी सत्र २०२० करिता यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने  पर्याय निवडलेला आहे.अशा सर्व विद्यापीठ अधिविभाग/ संलग्नित महाविद्यालये/ दूरशिक्षण केंद्राकडील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय निवडण्यासाठी दि.१५/०५/२०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे लिंकचा पर्याय विद्यार्थी स्तरावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठ संकेतस्थळावरील 
Web Page ---- online.unishivaji.ac.in --- Winter 2020 Imp  links for students --
Link ---- Update students mobile No., E-Mail ID for online examination
   
तरी ऑफलाईन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑनलाइन पद्धतीचा पर्याय उपयुक्त संगणक प्रणाली मध्ये सादर करावा. निवडलेल्या पर्यायाची पोहोच पावती/ Confirmation Receipt ची प्रिंट विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावी. तसेच संबंधित अधिविभाग/ महाविद्यालयाने ऑफलाइन पद्धतीने परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणेबाबत वरील उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकमधून पर्याय सादर करण्यासाठी आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे.
    
 तसेच या कामी संबंधित प्राचार्य, संबंधित विषयाचे विभाग प्रमुख व इतर संबंधित घटकांनीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पर्याय निवडण्यासाठी आपल्या पातळीवरून प्रवृत्त करून परीक्षा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन परीक्षा संचालक श्री. गजानन पळसे यांनी ११ मे,२०२१ च्या परिपत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments