पुण्या मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीला प्रमोशन न देण्याची भीती दाखवत पतीच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं विवाहित महिलेचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी अधिकाऱ्यानं गेल्या दीड वर्षापासून अनेकदा पीडित महिलेला आपल्या वासनेचं शिकार बनवलं आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विवाहितेनं दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सफदर अली खान असं आरोपीच नाव आहे. पीडित महिलेचा पती आणि संबंधित आरोपी एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. तर आरोपी व्यक्ती हा संबंधित कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहे. आरोपी व्यक्तीनं २०१९ पासून ११ मार्च २०२१पर्यंत अनेकदा लैंगिक शोषण केलं आहे. आरोपी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
0 Comments