मंगळवेढा/प्रतिनिधी:
मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम,सोलापूर ग्रामीण यांनी कोराना काळात चोरून चालणा-या जिल्हयातील अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू व इतर अवैध दारू विक्री करणा-यांवर कडक कारवाई करणेबाबत संपूर्ण जिल्हा व एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध दारू, वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विशेष पथकाची नेमणूक केली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील
त्यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करीत असताना स.पो.नि रवींद्र मांजरे व त्यांच्या टिमला
बातमीदाराकडून बातमी मिळाली की,मंगळवेढा येथील सुर्यवंशी वस्ती, पंढरपूर रोड मंगळवेढा जि. सोलापूर येथील एक इसम हा आपल्या राहत्या घरी देशी विदेशी दारूची मोठया प्रमाणात विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.
सदरची बातमी ही सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना कळविले असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे
यांनी पथकासह पंढरपूर रोड मंगळवेढा येथील सुर्यवंशी वस्ती जि. सोलापूर येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी मध्यम वयस्कर इसम हा घरासमोर खूर्चीवर बसून देशी विदेशी दारू ची अवैधरित्या विक्री करीत असल्याची खात्री झाल्यानंतर सदर ठिकाणापासून काही अंतरावर वाहन थांबवून पायी चालत सदर ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी मोठया प्रमाणात अवैधरित्या देशि विदेशी दारूचा साठा घरातील लाकडी दिवाणमध्ये ठेवलेला मिळून आला.
सदर ठिकाणी २९५९७ रू च्या मॅकडाॅल नंबर १ विस्की व रम, इम्पिरिअल ब्लू विस्की, राॅयल स्टॅग विस्की, डीएसपी ब्लॅक विस्की, ब्लेन्डर प्राईड विस्की, बॅग पाईपर, देशी संत्रा, सिग्नेचर विस्की,अॅन्टीक्युटी विस्की, ब्लेन्डर प्राईड च्या एकूण १८८ बाटल्या व १४४४० रू देशी विदेशी बाटल्या विकून आलेली रोख रक्कम असे एकूण ४४०३७ रू. चा मुद्देमाल सदर ठिकाणी मिळून आल्याने तो गुन्हयाचेकामी जप्त केला. असून सदर इसमा विरूध्द मंगळवेढा पोलीस ठाणेस गुरंन २४७/२०२१ महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९४९ चे कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.
0 Comments