सोलापूर/प्रतिनिधी:
सध्या सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या विविध ठिकाणच्या वाळूचोरी बाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आढावा घेऊन वाळू माफिया वर कडकं कारवाई करण्याच्या सूचना एलसीबी चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या, असल्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यात चोरुन चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर काडक कारवाई करण्यासाठी अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून कारवाईचा बडगा केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
मौजे मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर गावाच्या पूर्वेकडील ओढ्यातून काही इसम ट्रॅक्टर ट्रॉली च्या साह्याने शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना चोरून वाळू नेत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले असता गावचे पूर्वेकडील बाजूस वड्या लगत असलेल्या शेतामध्ये वाळूने भरलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली व काही इसम ही मोटरसायकली सह संशयित रित्या मिळून आले.
तेव्हा आणखीन ट्रॅक्टर ट्रॉल्या सदर ठिकाणी येतात अगर कसे थोडा वेळ दबा धरून बसले असता थोड्या वेळानंतर आणखीन दोन ट्रॅक्टर ट्रॉल्या सदर ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याजवळ जाऊन सहा इसमांना जागीच पकडले, काहीजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांच्या कब्जा तून एकूण चार ट्रॅक्टर चार डम्पिंग ट्रॉली सहा विविध कंपनीच्या मोटरसायकली दोन ब्रास वाळू दहा प्लास्टिक टोपल्या पाच खोऱ्या असे एकूण ते ३० लाख ७५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले सदर बाबत वळसंग येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे
१) अनिल माणिक मोरडे (वय ३५)
२) सदाशिव अरुण पाटील (वय २७)
३) बाबुशा अवधू पडळकर (वय ३१)
४) राहुल हरी चव्हाण (वय २१)
५) रामदास काशिनाथ रानडे (वय ३०)
६) अरुण गोविंद चव्हाण वय (२० वर्ष)
0 Comments