जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रांना खा. ओमराजे निंबाळकर यांच्या भेटी



तपासणी साठी येणाऱ्या रुग्णाची माहिती घेत, त्यांची विचारपूस करत, रुग्णांना दिला धीर.

 रणजीत पाटील/परंडा:

 उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संकटाची खबरदारी घेण्यासाठी धाराशिव लोकसभेचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांनी कंबर कसली आहे. त्यांनी जिल्हाभरातील अनेक आरोग्य केंद्रांना भेटी देत तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती घेतली. त्यांची विचारपूस करत त्यांनी रुग्णांना धीर दिला.

काल दि. २४ एप्रिल रोजी, धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथिल हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय CCC सेंटर, परांडा येथील उपजिल्हा रुग्णालय, भूम येथील ग्रामीण रुग्णालय अशा विविध आरोग्य केंद्रांना  भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली. रुग्णालयात असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला.  

कोरोना सेंटरवरती दररोज पिण्याचे पाणी, आंघोळी साठी गरम पाणी, उत्कृष्ठ नाष्ठा, पोटभर जेवण देतात का याची तपासणी करण्यात यावी.  व सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. व सेंन्टर वर आलेल्या रुग्णांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचना देण्यात आल्या. याची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील.  

पुन्हा एकदा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रत्येक गावात, नगरपालिका क्षेत्रात सूरु करण्यात यावी. घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात यावी, यामुळे पहिल्याच स्टेज मध्ये रुग्णांवर उपचार करता येतील. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या अधिकाधिक तपासण्या कराव्यात. तसेच कोरोना रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी दररोजच्या दररोज पाठवण्यात यावी. जिल्हा स्थरावरून रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच कोरोना महामारीच्या काळात सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, नर्स तसेच अन्य सर्वांनीच आपला पूर्ण अनुभव पणाला लावून या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे.

तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी जनतेला केले.

यावेळी अनेक स्थानिक शिवसेना नेते पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments