मंगळवेढा/प्रतिनिधी:
पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके याच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. पण तो नालायक विश्वजीत कदम आहे.त्याने माझ्यावर पोटनिवडणुकीत अत्याचार केला आहे. असा सनसनाटी आरोप अभिजित बिचुकले यांनी केला आहे. ते पंढरपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
मंगळवेढा येथील पाणीप्रश्न आजवर कोणीच का सोडवला नाही असा सवाल करत आपण या निवडणुकीत निवडून येणार असा विश्वासही अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केला आहे.
पंढरपूर विठू माउली मुळे प्रसिद्ध आहे पण एखाद्या खेडेगावापेक्षा भकास हे पंढरपूर झाले आहे, मन रमत नाही. मात्र, विठू माउलीसाठी याव लागतंय. निवडणुका लढत असताना मला अनेक अनुभव आले त्यात मी वरळीला आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण स्वतः उद्धवजी किंवा शिवसेनेकडून माझ्यावर कोणताही दबाव आला नाही.
0 Comments