भारत - इंग्लंड तिसरा कसोटी सामना: आतापर्यंतच्या अपडेट्स!



 अहमदाबाद येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी काही जादू दाखवू शकली नाही.  लीच-रुट जोडीने तब्बल ९ गडी बाद करत भारतीय संघाला १४५ धावांत गुंडाळलं. रोहित शर्माचा (६६) अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या अनुभवाला साजेशी फलंदाजी करता आली नाही.

इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला, त्यामुळे भारताला पहिल्या डावाअखेरीस केवळ ३३ धावांची आघाडी मिळाली.  पहिल्या दिवशी ५७ धावांवर नाबाद असणारा रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या दिवशी लागोपाठ पैवेलीयन मध्ये परतले आणि भारतीय संघ अडचणीत सापडला. मात्र, इंग्लंडचा कर्णधार जो रुट यानं ऋषभ पंत आणि  वॉशिंगटन सुंदर यांनाही माघारी धाडलं. अवघ्या १२५ धावांवर भारतीय संघाचे ८ फलंदाज माघारी परतले आहेत. 

अजिंक्य रहाणे (७ ), ऋषभ पंत ( १),  रविचंद्रन अश्विन (१७), अक्षर पटेल (०) अशी फलंदाजीची स्थिती आहे.  सध्या पहिल्या डावांत भारतीय संघाकडे फक्त २२ धावांची आघाडी आहे. भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवलं. फिरकीपटू अक्षर पटेल यानं (६/३८) केलेल्या अप्रितिम गोलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडला पहिल्या डावांत ११२ धावांवर रोखलं. 

 त्यानंतर रोहित शर्मा यानं नाबाद अर्धशतक झळकावत भारताची स्थिती सुधारली.  पहिल्या दिवस अखेरीस भारताने ३ बाद ९९ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात यजमान टीम फक्त १३ धावांनी पिछाडीवर आहे.
 सलामीवीर शुबमन गिल (११) आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा (०) स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या साथीने रोहितने तिसऱ्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी रचली. कोहली दिवसाच्या शेवटच्या षटकांत २७ धावांवर क्लीन बोल्ड झाला. 

Post a Comment

0 Comments