भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्माने २५ आणि शुभमन गिलने १५ रन केले. भारताने १० विकेटने तिसरा सामना जिंकत २-१ ने आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना २ दिवसात संपला आहे.
दुसर्या डावात भारताला विजयासाठी ४९ धावांची गरज होती. भारताने फक्त ७.४ ओव्हरमध्ये ते पूर्ण केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
अक्षर पटेल विजयाचा नायक
भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने पहिल्या डावात ३८ धावा देऊन ६ विकेट घेत इंग्लंडला घाम फोडला. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. दुसर्या डावात त्याने ३२ धावा देत ५ विकेट घेतले. अशा प्रकारे त्याने या सामन्यात ११ विकेट घेतले.
अश्विनची दमदार कामगिरी
रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात २६ धावा देऊन ३ विकेट घेतले. तर दुसऱ्या डावात ४८ धावा देऊन ४ विकेट घेतले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील ४०० विकेटही पूर्ण केले. असे करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
0 Comments