मराठा उमेदवारांना EWS चा पर्याय निवडण्याची सूचना MPSC


 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी “SEBC’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची सूचना आयोगाने केली आहे. त्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

एमपीएससी’तर्फे २०२०या वर्षासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या चार परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

(Advertise)

परीक्षांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी “एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज भरले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने “एसईबीसी’ आरक्षणावर स्थगिती आणल्याने या परीक्षा अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. परीक्षा घेण्यास विलंब होत असल्याने “एमपीएससी’च्या कारभारावर टीका केली जात आहे. त्यातच आता राज्य शासनाने २३ डिसेंबर २०२० रोजी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे “एसईबीसी’ प्रवर्गातील अर्जामधील प्रवर्ग बदलण्याची सूचना “एमपीएससी’ने केली आहे.

महत्त्वच्या सूचना :-

आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन “एसईबीसी’ आरक्षणासाठी दावा केलेल्यांनी खुला गट किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) यापैकी एका आरक्षणाचा पर्याय निवडावा.

Post a Comment

0 Comments