भारताचा चीनला आणखी एक धक्का..


भारताच्या विरोधात वारंवार कारवाया करणाऱ्या चीनला आणखी एक धक्का देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून लीथियम खरेदीसाठी अर्जेंटिनासोबत करार करण्यात आला आहे. विजेवर चालणारी वाहने, मोबाईलसह असंख्य इलेक्ट्रिक वस्तूंच्या बॅटऱ्यासाठी लीथियमचा वापर केला जातो.

चीनवरील भिस्त कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असून आत्मनिर्भर अभियानाला त्यामुळेच बळ दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या अखत्यारितील खनिज विदेश इंडिया लिमिटेडने लीथियम खरेदीसाठी अर्जेंटिनासोबत करार केला आहे. रिचार्जेबल बॅटऱ्या तयार करण्यासाठी लीथियम वापरले जाते.

विदेशातून लीथियम, कोबाल्ट तसेच इतर खनिजांची खरेदी करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील नाल्को, हिंदुस्थान कॉपर व मिनरल एक्स्प्लोरेशन लिमिटेड यांनी खनिज विदेशी इंडियाची ऑगस्ट २०१९ मध्ये स्थापना केली होती. बोलिविया आणि इतर देशातूनही अशा खनिजांची खरेदी करता येते का, याची चाचपणी खनिज विदेश लि. कडून सुरु आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक गाड्याच्या निर्मितीवर भर देण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणावर लिथियम लागणार आहे. सध्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चीनकडून लिथियमचा पुरवठा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments