मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारला मंगळवारी आणखी एक मोठा हादरा बसला. राज्याचे युवक सेवा आणि क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे सोपवला आहे.
ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय माजी मंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी तृणमूलला सोडचिट्ठी देत भाजपचा हात धरल्यानंतर १६ दिवसांनी माजी रणजीपटू शुक्ला यांनी राज्याचं मंत्रिपद सोडलं आहे. लक्ष्मी रतन शुक्ला हे क्रीडापटू आहेत. त्यांनी खेळासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा कोणीही देऊ शकतो. त्यांच्या राजीनाम्याचा संबंध कुणी पक्षातील नाराजीशी जोडू नये. ते तृणमूलच्या आमदारपदावर कायम राहणार आहेत, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
0 Comments