कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आणि आता लसीकरण होणार असल्याच्या चर्चा आहेत. हे व्हॅक्सिन प्रत्येकाला उपयुक्त ठरेल की, नाही यावर अनेक चर्चा रंगू शकतात. मात्र, खरा प्रश्न निर्माण होतो तो दारू पिण्याची सवय असणाऱ्या लोकांचा. जी मंडळी मद्यपान करतात, त्यांना लस घेण्यापूर्वी किंवा नंतर मद्यपान केलेले चालू शकते किंवा नाही असा प्रश्न पडला असेलच. चला तर मग जाणून घेऊया उत्तर काय आहे.
आपण सर्वच जण जाणतो की, माणसाच्या आतड्यांमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव बाहेरील जिवाणू आणि विषाणू यांचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम असतात. या सूक्ष्मजीवांच्या रचनेत दारूमुळे बदल होऊ शकतो. पांढऱ्या पेशी व लीम्फोसाइट्सना यामुळे हानी निर्माण होऊ शकते.
लीम्फोसाईट्स आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार करतात. पांढऱ्या पेशी आपल्याला रोगांपासून वाचण्याची शक्ती देतात. एका प्रयोगाअंती असे आढळून आले आहे की, तीन ग्लास प्यायलेल्या मद्यामुळे रक्तातल्या या लिम्फोसाइट् ५० टक्क्यांपर्यंत कमी झालेल्या आहेत. त्यामुळे, शरीराने लसीला योग्य प्रतिसाद द्यावा असे तुम्हास वाटत असेल, तर ज्या काळात तुम्हाला लस घ्यायची आहे त्या काळात तुम्ही मद्यपान करू शकत नाही. लस घेण्याच्या आदल्या रात्री किंवा लस घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही मद्यपान केले, तर लसीची उपयुक्तता कमी होऊ शकते.
लस घेऊनही जर प्रतिकारशक्तीत वाढ करणाऱ्या पेशीच कमी होणार असतील तर, त्या लस घेण्याचा फायदा तो काय? १३ जानेवारी पूर्वीच लसीकरणाला सुरवात होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाकडून कळते आहे. त्यामुळे जर कोरोनापासून बचाव करणारी लस हवी असेल तर, मद्यपानाला थोडा काळ बाय बाय म्हटलेलेच बरे.
0 Comments