....म्हणून पश्चिम बंगालमध्ये शिवसेना १०० जागा लढवणार


नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीसाठी आतापासून राजकीय पक्षांनी या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केलीय. भाजप, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेसबरोबरच ओवेसींची पार्टी AIMIM सुद्धा निवडणुका लढणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनंही पश्चिम बंगालमध्ये १०० जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत.

एका खाजगी वाहिनीच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा पश्चिम बंगालचा दौरा करू शकतात. शिवसेना कोलकाता, हुगळी, दमदमसह अनेक भागांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते. तसेच निवडणूक लढण्याचा अंतिम निर्णय २९जानेवारीला पक्षाच्या बैठकीत होणार आहे.

(Advertise)

शिवसेनेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार केल्यास त्याचा भाजपला फटका बसू शकतो. भाजपनं या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावलीय. शिवसेनेनं २०१५ मध्येही बंगालमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजपा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष होते. पण शिवसेना महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये ताटातूट झाली.शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण पावलानं अनेक पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ओवैसी यांच्या पश्चिम बंगालमधील एंट्रीनंतर शिवसेनेच्या संजय राऊतांनीही सूचक प्रतिक्रिया दिली होती. कोणीही काहीही करा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच जिंकणार, असंही संजय राऊत म्हणाले होते.

Post a Comment

0 Comments