बार्शीत वृत्तपत्र संघाच्यावतीने वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे आयोजन….


बार्शी/प्रतिनिधी:

याबाबत सविस्तर माहिती अशी की बार्शी वृत्तपत्र महासंघाच्या वतीने साप्ताहिक वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिन बुधवार दिनांक ६ जानेवारी २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनय भाई संघवी (कार्यकारी संचालक संघवी उद्योग समूह बार्शी) तसेच प्रमुख वक्ते म्हणून सचिन जी वायकुळे सर उपसंपादक दैनिक संचार यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे

तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती बार्शी नगरपालिकेचे प्रथम नागरिक विद्यमान नगराध्यक्ष आसिफ भाई तांबोळी, अभिजीत धाराशिवकर (विभागीय पोलीस अधिकारी), संतोष गिरीगोसावी (पोलीस निरीक्षक बार्शी पोलीस स्टेशन), डॉक्टर शीतल बोपलकर (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बार्शी), अरुण दादा बारबोले (अध्यक्ष यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी), दीपक राऊत (गटनेते बार्शी नगरपालिका), नागेश अक्कलकोटे (विरोधी पक्षनेता बार्शी नगरपालिका), राजा माने (ज्येष्ठ संपादक), वैभव पाटील (अध्यक्ष विक्रांत दादा पाटील फाउंडेशन), ॲड राजश्री डमरे (महिला जिल्हाध्यक्ष भा ज पा),  ॲड विक्रम सावळे (जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस), ॲड प्रशांत शेटे (विधिज्ञ), ॲड राहुल झालटे(विधिज्ञ), डाँ अविद पटेल( बाल रोग तज्ञ), कमलेश भाई मेहता(उद्योजक) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे याबाबत मार्मिक समाजाशी बोलताना अध्यक्ष विजय लोखंडे यांनी सांगितले की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक काकडे (कार्याध्यक्ष); सौ सुवर्णा शिवपुरे (उपाध्यक्ष) ,विजय शिंगाडे (सचिव) ;किरण नान्नजकर (सहसचिव) ;सौ संगीता पवार (खजिनदार) कार्यकारी सदस्य संदीप मठपती ,संतोष सुर्यवंशी, सुहास कांबळे ,संदीप आलाट, राजा भाऊ काकडे, प्रभुलिंग स्वामी, गोविंद भिसे ,जमीर शेख, सुनील गोलकोंडा, व सर्व सभासद पत्रकार बंधूंच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments