मालेगाव बॉम्बस्फोट : भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर कोर्टात हजर


२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील एनआयएच्या विशेष कोर्टाने सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी आणि भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आज कोर्टासमोर हजर झाल्या. त्यांनी आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टात नियमित हजर राहण्यापासून सूट द्यावी, अशी विनंती केली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित प्रसाद, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय रहीरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चर्तुवेदी यांच्यासह सर्व ७ जणांवर दहशतवादी कृत्य करणे, हत्या आणि अन्य गुन्ह्यांखाली आरोप निश्चित केले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टात त्यांच्याविरोधात खटला सुरू केला आहे.

या सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार तर सुमारे शंभर जण जखमी झाले होते

Post a Comment

0 Comments