बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींना उद्या मिळणार 'डिस्चार्ज'


 भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना शनिवारी (दि.२)रोजी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सौरव गांगुली यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून आता त्याची प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यामुळे, त्यांना उद्या 'डिस्चार्ज' देण्यात येणार आहे, अशी माहिती वुडलँड रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रूपाली बसु यांनी दिली आहे.

डॉ. रूपाली बसु पुढे म्हणाल्या की, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना उद्या वुडलँड रुग्णालयातून 'डिस्चार्ज' देण्यात येणार आहे.सौरव गांगुली यांच्या घरी डॉक्टरद्वारे त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे, असे डॉ. रूपाली बसु यांनी स्पष्ट केले आहे.


Post a Comment

0 Comments