बार्शी/प्रतिनिधी:
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आचारसंहिता लागू झाली आहे. बार्शी तालुक्यात ९५ ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. बार्शी विधानसभा ही अतिसंवेदनशील म्हणून ओळखली जाते. बार्शी तालुक्यात आमदार राऊत गट व माजी मंत्री सोपल गट यांच्यात नेहमीच चुरस पाहायला मिळत आली आहे. मात्र मात्र गाव कारभऱ्याच्या निवडणूकीत गावात दुरंगी व त्रिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.
वैरागसाठी नेतेमंडळी घेत आहेत खबरदारी
बार्शी तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची प्रक्रिया प्रशासन स्तरावर सुरू आहे. दरम्यान, निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक रद्द करण्याची मागणीही झाली परंतु अदयाप तरी निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केलेली नाही. वैरागमध्ये अदयापतरी एकही अर्ज दाखल झालेला नाही. वैराग ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तर पानगाव ग्रामपंचायत निवडणूक विषयक सर्व टप्पे रद्द करण्यात यावेत व या ग्रामपंचायतीचा चालू निवडणूक कार्यक्रमामध्ये समावेश करू नये, अशा आशयाचे पत्र बार्शी तहसीलला जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे आरक्षण योग्य रीतीने व नियमानुसार झाले नसून, ते सदोष असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे.
या ग्रामपंचायतील निवडणुका होणार चुरशीच्या
बार्शी तालुक्यात ९५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागसह, उपळाई (ठोंगे), गौडगाव, उपळे दुमाला, पांगरी, मालवंडी, आगळगाव, शेळगाव, रातंजन, सारोळे, नारी, खामगाव, चिखर्डे, कोरफळे, श्रीपतपिंपरी, खांडवी, बावी आदी ११, १३, १५ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या गावात मोठी चुरस दिसू लागली आहे. तर मळेगाव ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत ही ग्रामविकासाचा कणा मानली जाते. यामुळे आता बार्शी तालुक्यातही राजकारण तापत असताना दिसत आहे.
बिनविरोध ग्रामपंचायतील ग्रामस्थांना मोफत रक्तपुरवठा
बार्शी तालुक्यात ज्या गावांमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांच्या एकमताने बिनविरोध निवडून येतील, त्या गावांमधील सर्व ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार मोफत रक्तपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय श्री भगवंत ब्लड बॅंकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी घेतला आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी रक्तदानाच्या चळवळीला गती देण्याचे काम केले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक गटातटाचे राजकारण
बार्शी विधानसभा मतदारसंघ हा राज्यात संवेदनशील म्हणून ओळखला जातो बार्शी तालुक्यातील ९५ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गटातंटाचे राजकारण पाहायला मिळणार आहे. आमदार राजेंद्र राऊत यांचा या ग्रामपंचायत या निवडणुकीवर मोठा प्रभाव असणार आहे तर शिवसेना नेते दिलीप सोपल यांना मानणारा मोठा वर्ग आहे या दोन्ही गटात मोठी चुरस असणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस निरंजन भुमकर यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहे तर राजेंद्र मिरगणे यांचा गट ही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. थेट सरपंचाची निवडणूक असल्याने सध्या राजकीय पक्षानी या निवडणुकात जास्त लक्ष देण्यास सुरूवात केली आहे तरी एक पक्षाला मानणारे दोन तीन गट तालुक्यात आहेत.
बार्शी ग्रामीण भागात सुविधांचा वनवा
पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाडा ला जोडणारा जोडणारा तालुका म्हणून बार्शी ची ओळख आहे बार्शी शहर सोलापूर जिल्ह्यातील विकसित शहर म्हणून ओळखले जाते मात्र बार्शी ग्रामीण भागातील पाण्याच्या अभावामुळे दुष्काळी पट्टा परिचित आहे तालुक्या मोठ्या प्रमाणावर आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतो या निधीचा विकासासंदर्भात वनवा असल्याचे दिसून येते तालुक्यामध्ये आजही रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था बाबतीतही दुष्काळ आहे. थकलेली घरपट्टी, पाणीपट्टी जमा करणे, अगदी घराचे लाईट बिलेही भरून दिली जात आहेत. तर ज्येष्ठांना निराधार पगार चालू करू, घरकुल बांधून देऊ अशी अश्वासनेही मिळत आहेत. यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे गावागावात सध्या पक्षीय रंगाच्या आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या गरमा गरम चर्चा सुरू आहेत.
0 Comments