जयसिंगपूर/प्रतिनिधी - रोहित जाधव
कोरोना महामारीमुळे शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर मधील विक्रमसिंह क्रीडांगण येथे होणारी ऊस परिषद उदगाव येथील कल्पवृक्ष गार्डन येथे संपन्न झाली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी खासदार राजू शेट्टी, सभेचे अध्यक्ष जयकुमार कोल्हे, माजी मंत्री रविकांत तुपेकर,प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील, अनिल उर्फ सावकार मादनाईक, युती आघाडीच्या महिला अध्यक्षा पूजा मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती,
वाढीव एफ आर पी तीच आहे तर वाढवून १४ टक्के द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे राजू शेट्टी म्हणाले,जर एकहाती एफ आर पी नाही दिली तर कारखानदारांना सोडणार नाही असा इशारा ही देण्यात आला, राजू शेट्टी यांनी ९ ठराव मांडले व कार्यकर्त्यांनी हात वर करून प्रस्तावाला मंजुरी दिली, शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेला पदाधिकारी तसेच कार्यकर्त उपस्थित होते.
यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शासकीय नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंग व मास्क लावून ही ऊस परिषद संपन्न झाली.
0 Comments