अपमान विसरलेलो नाही; विसरणारही नाही, वेळ आली की, सांगू - संजय राऊत



राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवगेळ्या मुद्यांवरून चर्चा सुरू असून, राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अभिनेत्री कंगना रणौतनंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्याचबरोबर विरोधकांकडूनही टीका केली जात आहे. याच मुद्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला राऊत यांनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत  यांची पत्रकार आशुतोष यांनी मुलाखत घेतली. आशुतोष यांनी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर होत असलेल्या टीकेबद्दल प्रश्न उपस्थित केला. “एक प्रश्न विचारतोय. आपण वाईट वाटून घेऊ नका आणि उत्तर द्या. एक काळ होता जेव्हा लोक म्हणायचे की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांविरोधात कुणी एक शब्द बोलून बाहेर पडू शकत नव्हता. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना धडा मिळाला. उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल एका टिव्हीचा संपादक मागील दोन महिन्यांपासून ज्या प्रकारची भाषा वापरत आहे, एक अभिनेत्री कंगना रणौत ज्या पद्धतीची भाषा बोलत आहे. तुम्हाला वाटत का शिवसेना कमजोर झाली आहे?,” असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले,”शिवसेना कुमकुवत झालेली नाही. शिवसेना सत्तेत आहे. आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. आमचे लोग खूप रागात आहेत. आम्ही आधीही सांगितलं की, जेव्हा विरोधी बाकांवर होतो, तेव्हा एका इशाऱ्यावर लोक रस्त्यावर उतरत होते. जे वाटेल ते आम्ही करायचो. माझ्यावर १४० पेक्षा जास्त खटले सुरू आहेत. आम्ही घाबरणारे लोक नाही आहोत. पुढेही घाबरणार नाही. सत्ता येते. सत्ता जाते. सत्ता घेऊन कुणीही येत नाही, आम्हीही राहणार नाही. सगळ्यांना जावं लागणार आहे. सोडावी लागणार आहे. जे आमच्यावर भुकंत आहेत, त्यांनाही माहिती आहे. भीती तर त्यांच्या मनात आहे. ते फक्त वरून दाखवत आहेत. पण, जेव्हा वेळ येईल, तेव्हा सांगू. विसरलेलो नाही. आमचा अपमान विसरणार नाही. हा महाराष्ट्र आहे,” असं उत्तर देत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या इशारा दिला.

Post a Comment

0 Comments