जगाला अहिंसा व शांती ची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती चे औचित्त साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजाराम तलाव येथे स्वछता मोहीम घेण्यात आली.
राजाराम तलावात स्वच्छ पाणी, निरागरम्य परिसर असल्यामुळे सर्व वर्गांसाठी तो एक आकर्षणाचा विषय झाला आहे. सकाळी फिरायला येणार्यांपासून, रात्री च्या ओल्या पार्ट्यां पर्यंत हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. त्या पार्ट्यां मुळेच व जवळच असलेल्या मॅकडोनल्ड्स व इतर फास्ट फूड च्या फेकलेल्या कचऱ्या मुळे येथील परिसरात प्रदूषण व दुर्गंधी पसरली होती.
या परिसरालातील निसर्गाला संजीवनी देण्याच्या तसेच सामाजिक भावनेच्या उद्देशाने "अग्ली कोल्हापुरी" या उपक्रमांतर्गत कोल्हापूर येथील राजाराम तलाव येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोट्रॅक्ट क्लब कोल्हापूर यांच्या वतीने साफसफाई करण्यात आली व तब्बल १ ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमाच्या पुढच्या टप्प्यात तलाव परिसरामध्ये कचरा पेटी व सूचना दर्शक फलक बसविण्यात येणार आहेत अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष अरविंद कृष्णन व रोट्रॅक्ट क्लब चे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली या प्रसंगी सेक्रेटरी सिद्धार्थ पाटणकर, मानव गुळवणी, अथर्व धनाल, ध्रुव मोदी व सुमारे ६० सभासद उपस्थीत होते.
0 Comments