मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल करण्यात येणार नाही. आहे त्यात काहीच बदल होणार नाही, असं सांगतानाच नाथाभाऊ हे जयंत पाटलांच्यासाथीने पक्ष वाढवण्याचं काम करतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पवारांनी हे संकेत दिले.
नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी माझ्याशीही चर्चा केली. त्यावेळी त्यांनी एका शब्दांनीही माझ्याकडे कोणत्याही पदाची अपेक्षा व्यक्त केली नाही.
0 Comments