सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकरण खंडपीठाकडे पाठवून सध्या लागू असलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजासाठी विशेष योजना लागू करा, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्या. जेणेकरुन मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. स्थगिती मिळाल्यावर उदयनराजे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.
मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हतं. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो. मी तुमच्या सोबत आहे, असं उदयनराजेंनी म्हटलं होतं.
दरम्यान, मराठा आंदोलनाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने न घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
0 Comments