उस्मानाबाद: शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपी तुरुंगातून पसार झाला होता. त्याला उस्मानाबाद शहराजवळील एका मंदिरातून अटक करण्यात आली आहे.
शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जीवघेणा चाकूहल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळे (रा. नायगाव पाडोळी, ता. कळंब) याला अटक केली होती. तो तुरुंगात होता. त्याने सोमवारी दुपारी तुरुंगातून पळ काढला होता. उस्मानाबाद शहराजवळच्या शिंगोली गावात एका मंदिरात तो लपून बसला होता. पोलिसांनी त्याच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या प्रचार सभेत खासदारांवर हल्ला केला होता.
0 Comments