धाराशिव | किर्ती किरण पुजार यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली



धाराशिव |

 जिल्हाधिकारी पदाची सूत्रे श्री.किर्ती किरण पुजार यांनी आज २७ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वीकारली. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची बदली सोलापूर महानगरपालिका आयुक्त या पदावर झाल्यानंतर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव यांच्याकडे होता.राज्य सरकारने २५ फेब्रुवारी रोजी भारतीय प्रशासकीय सेवेतील ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशात काढले. त्यामध्ये श्री.पुजार यांची बदली धाराशिव जिल्हाधिकारी या पदावर केली.

श्री.पुजार हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या सन २०१८ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत.त्यांचे शिक्षण आय.आय.टी मद्रास येथे एम टेक झाले आहे.यापूर्वी श्री.पुजार यांनी परिविक्षाधिन अधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे उपविभागीय अधिकारी व नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले आहे.धाराशिव जिल्हाधिकारी या पदावर येण्यापूर्वी श्री.पुजार हे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.


Post a Comment

0 Comments