धाराशिव |
धाराशिव शहरातील यशवंत नगर येथील 24 वर्षीय तरुणीने फोन उचलला नाही म्हणून जीव गेला हल्ला केल्याची घटना धाराशिव शहरात घडली आहे. याप्रकरणी पांडुरंग अर्जुन शिंदे रा. यशवंत नगर, सांजा धाराशिव यांच्यावर आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटने संबंधी सविस्तर माहिती अशी, आनंद नगर पोलिसात या घटनेची फिर्याद राधा अनिल आदलिंगे, वय 24 वर्षे, रा. यशवंत नगर, सांजा यांनी दिली. आरोपीने फोन न उचलण्याच्या कारणावरून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments