कोल्हापूर :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रंगरेज इन्फोटेक च्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करुन बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सहभागात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मूर्तीस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी पत्रकार मतीन शेख आणि संस्थेचे अध्यक्ष अर्जुन रंगरेज प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगरेज इन्फोटेकचे संचालक कु.प्रतीक जाधव यांनी केले, तर उपस्थित पाहुण्यांची ओळख संस्थेच्या संचालिका शिवानी कदम यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या कुशल ट्रेनर अनिषा आणि तय्यबा यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले. त्यांच्या संयोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक सुंदरपणे पुढे सरकला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मतीन शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन आयुष्य आणि स्पर्धात्मक मार्केटमध्ये कौशल्यांचे महत्त्व आणि संगणक क्षेत्रातील आधुनिकतेची अपरिहार्यता यावर सखोल विचार मांडले. मतीन शेख सर म्हणाले, "आजच्या काळात फक्त शैक्षणिक पात्रता पुरेशी नाही. आपण दैनंदिन आयुष्य जगत असताना आणि मार्केटमध्ये यश मिळवायचे असेल तर योग्य कौशल्ये आत्मसात करणे खूप महत्त्वाचे आहे. कौशल्यांमुळे केवळ करिअर घडत नाही, तर व्यक्तिमत्त्वाला घडवण्याचे कामही होते. आत्मविश्वास, सर्जनशीलता, आणि वेळेचे व्यवस्थापन यांसारखी कौशल्ये व्यक्तीला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महत्त्वाची ठरतात. त्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केले की, कुस्ती हा खेळ असो किंवा एखादे तंत्रज्ञान क्षेत्र, त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत, सातत्य, आणि नवकल्पना आवश्यक असते. तसेच त्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केले की, कुस्ती हा खेळ असो किंवा एखादे तंत्रज्ञान क्षेत्र, त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत, सातत्य, आणि नवकल्पना आवश्यक असते.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अर्जुन रंगरेज यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा देणारे विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्याचे व त्यातून आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन केले.
रंगरेज इन्फोटेक दसरा चौक कोल्हापूर मध्ये आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. टायपिंग स्पर्धा, लोगो डिझाइन, डिजिटल पेंटिंग, प्रोजेक्ट फाईल प्रेझेंटेशन आणि मेहंदी डिझाइन या स्पर्धांत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवांविषयी बोलताना संस्थेत मिळालेल्या शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि असे उपक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशी विनंती केली.
क्लासच्या विद्यार्थिनी दीप्ती करीशेटी यांनी कोरिओग्राफी केलेला देशभक्तीपर डान्स विद्यार्थिनींनी सादर केला. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले आणि संपूर्ण कार्यक्रमात उत्साह भरला. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना अल्पोपहार देऊन करण्यात आली.रंगरेज इन्फोटेक दसरा चौक कोल्हापूर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उर्जा निर्माण झाली आणि त्यांचे कलागुण फुलून आले. संस्थेच्या सर्व टीमने केलेल्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. सर्व उपस्थितांनी रंगरेज इन्फोटेक दसरा चौक कोल्हापूर उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी असा उपक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेला शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments