धाराशिव: निवडणूक आयोगाने ईव्हीएमची विश्वासार्हता कायम राखावी यासाठी काँग्रेसचे आंदोलन, निवडणूक आयोगाने पक्षपाती केल्याचा गंभीर आरोप


धाराशिव |

मतदान कालावधी संपला त्या दिवशीची मतांची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे. सत्ताधारी व विरोधक या पक्षांना पडलेल्या मतांवरून निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनची विश्वासार्हता कायम राखावी. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतांचं झालेला फरक. त्यावरून जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२५ जानेवारी रोजी आंदोलन केले. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिलेले आहेत लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्य साधारण महत्व आहे देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे निवडणुकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबर 24 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय आश्चर्यकारक अविश्वासनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजप युतीच्या विरोधात होती सहा महिन्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते मात्र अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पारले जाऊ शकते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही मतदार यादी मध्ये घोटाळा करण्यात आला याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारी करून ही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांना निवडणूक निकालात ही घोटाळा करण्यात आला लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या ६ महिन्यांच्या अंतरात 50 लाख मतांची वाढ कशी झाली मतदाना दिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे यात ही ७६ लाख मतदान या मतदार वाढलेले दाखवले आहेत. 

त्याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत मात्र त्याची माहिती अद्याप पर्यंत देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे राज्यातील मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे जनतेची ही भावना महत्वाची आहे. मतदान राष्ट्रीय मतदार दिवसाची औचित्य साधून काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफास केला आहे. त्यामुळे आपले मत चोरले गेल्याची जनतेची भावना आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान व विश्वास कायम ठेवून विश्वासहार्यता अबाधित राहील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. 

यावेळी जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी तथा आमदार धीरज देशमुख, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ऍड धीरज पाटील, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, डॉ स्मिता शहापूरकर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, अशोक बनसोडे, सरफराज काझी, प्रभाकर लोंढे,  अभिमान पेठे, विजयकुमार वाघमारे, अर्जुन बिराजदार, अमित रेड्डी, ऍड इरफान जमादार, अनंतराव घोगरे,  गोपाळ गव्हाळे इस्माईल मुलानी दामू नागनाथ शेळके संदीप लोखंडे संतोष मुंडे संदीप कदम काकासाहेब सोनटक्के, दयानंद खटके पांडुरंग कुंभार अशोक शेळके आयुब पठाण जावेद काजी प्रकाश आष्टे विनोद वीर, बालाजी दुधाने तानाजी जाधव शिवाजी चव्हाण नामदेव घोडके विकास गंभीरे प्रेमानंद सपकाळ कानिफनाथ देवकुळे संजय गजधने  धीरज जाधव आशुतोष पोतदार, चंद्रकांत सोनवणे सयाजी देशमुख राजुदास आडे संदेश माने मकरंद बामनकर आदीसह कार्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments