वयानुसार महिन्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवावे?, महत्त्वाची माहिती समोर



सेक्स ही केवळ एक शारीरिक प्रक्रिया नसून, त्याचा भावनात्मक आणि मानसिक आरोग्यावरही महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. एका नवीन अहवालात विविध वयोगटातील  लोकांनी महिन्यातून किती वेळा सेक्स करावा, याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. हे आकडे अनेक वैज्ञानिक अभ्यास आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहेत. चला तर मग, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती. 

20-30 वर्षे वयोगट:
या वयोगटातील लोक शारीरिकदृष्ट्या सर्वाधिक सक्रिय असतात. या वयात महिन्यातून 10-15 वेळा सेक्स करणे सामान्य मानले जाते. या वयात सेक्स हार्मोन्स सर्वात जास्त सक्रिय असतात.

30-40 वर्षे वयोगट:
या वयोगटात करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे महिन्यातून 6-8 वेळा सेक्स करणे सामान्य मानले जाते. ही वारंवारता तणाव, जीवनशैली आणि आरोग्यावर देखील अवलंबून असते.

40-50 वर्षे वयोगट:
या वयात शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. अशावेळी महिन्यातून 4-6 वेळा सेक्स करणे सामान्य मानले जाते. 

50 वर्षे आणि त्यावरील वयोगट:
या वयात सेक्सची वारंवारता व्यक्तीच्या शारीरिक स्थिती  आणि आरोग्यावर अवलंबून असते. महिन्यातून 1-3 वेळा सेक्स करणे पुरेसे ठरू शकते.

महत्त्वाचे म्हणजे, सेक्सची वारंवारता ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. वरील आकडे हे सर्वसाधारण असून, वैयक्तिक गरजा आणि इच्छा यानुसार त्यात बदल होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments