परंडा |
तालुक्यातील आवारपिंपरी येथे ते करंजा मार्गावर वाळूची ट्रॅकटर मधून होणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखणाऱ्या मंडळअधिकाऱ्यास ट्रॅकटर खाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून परंडा पोलिसांनी एक जणास ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.
याप्रकरणी मंडळाधिकारी दुर्गाप्पा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनाथ डाकवाले व नागनाथ नरसाळे यांच्या विरोधात परंडा पोलिसात गुन्हा दाखल केला असून यापैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments