निवडणुकीचा निकाल लाडक्या बहिणींचा कि ईव्हीएमचा ?



नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि कोणालाही कल्पना नसेल असे निकाल महाराष्ट्रात आले. या निवडणूकीत कोणतीही लाट नव्हती किंवा कोणते वादळ नव्हते. सर्वसामान्य जनतेच्या भुवया उंचावल्या असे निकाल लागल्यामूळे संशयाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 
    महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीनंतर सरकारने ज्या पद्धतीने शासकीय योजनांची उधळण केली जसे की "लाडकी बहीन" त्यावरून असे ग्रहीत धरले जात आहे कि या योजनेमुळे सरकारला हे निकाल मिळाले आहेत असे बिंबवले जात आहे. परंतू याच महाराष्ट्र मागील काही महिन्यांमध्ये महिलावरील अत्याचार,लहान मुलीवरील बलात्कार अशा घटना हा महाराष्ट्र कसा विसरू शकेल ही दाट शंका येत आहे. बदलापूर सारख्या घटनेमुळे महाराष्ट्रात हरळून निघाला असताना देखील महिला मतदान कशा करू शकतात हा सर्वात मोठा प्रश्न आज महाराष्ट्रात निर्माण होत आहे. 
    महाराष्ट्रातील निकालावरून असेही लक्षात येत आहे की, लाडकी बहिण या योजनेला पुढे करून सरकारने ईव्हीएम हॅक करण्याचे काही कारस्थान रचले होते का? असा प्रश्न निर्माण होत आहे. याचे कारण असे कि, निकालाच्या दिवशी पहील्या एक फेरीत टपाली मतदान (Portal Voting) मध्ये निकाल हे बरोबरीने चालत होते. 
    साधारणतः 9 वाजण्याच्या आसपास 137 महायुती, 135 महाविकास आघाडी व अपक्ष-16 असे पहील्या फेरीत निकाल असताना अचानक ईव्हीएमची मतमोजणी चालू झाल्यानंतर यात पुर्णपणे बदल झाले. यावरून अशी शंका येते कि, हे कदाचीत पुर्व नियोजीत तरी निकाल नाहीत ना?  ज्या पद्धतीने अनेक संस्थानी एक्झिट पोल दिले ते पूर्ण पोल चुकीचे कसे असू शकतात असाही प्रश्न निर्माण होत आहे?  
    महाराष्ट्रात या सरकार विरोधात वातावरण असताना असे निकाल येऊ शकतात यावरून लोकशाही खरंच धोक्यात जात आहे का? याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची होणारी विटंबना, महापुरूषांच्या बद्दल बोलले जाणारे चुकिचे वक्तव्य, पोलीस प्रशासनावर केली जाणारे वक्तव्य, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असताना, महाराष्ट्रातील उद्योग धंद्याची पळवा पळव चालू असताना असे निकाल लागतात यावर विश्वास बसत नाही.

Post a Comment

0 Comments