सर्वांनाच एक धक्का देणारी घटना छत्रपती संभाजीनगर मधील पैठणमध्ये घडली आहे. इथं एक डॉक्टर आईनं आपल्या 5 महिन्याच्या बाळासह आत्महत्या केली आहे. याघटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. या मागचे कारण त्या पेक्षाही धक्कादायक आहे.
आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेला अंगावर दूध येत नव्हते. त्यामुळे ती बाळाला दूध देवू शकत नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे. याबाबत पोलिस अधित तपास करत आहेत.
डॉ. पूजा व्होरकटे या पैठणमध्ये राहात होत्या. त्यांनी प्रभाकर व्होरकटे यांच्या बरोबर काही वर्षापूर्वी लग्न केले होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांना एक बाळ झाले. बाळाचा जन्म झाल्यापासून डॉ. पूजा व्होरकटे बाळाची काळजी घेत होत्या. मात्र त्यांना अंगावर दूध येत नव्हते. त्यामुळे त्यांना बाळाला दूध पाजता येत नव्हते. याचा त्रास त्यांना होत होता. त्याचा सतत विचार त्यांच्या डोक्यात येत होत्या. त्यात गेल्या आठ दिवसांपासून त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या.
बाळाच्या काळजी पोटी अनेक विचार त्यांच्या मनात येत होते. त्यातून त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी थेट आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्यासह आत्महत्याच केली. दूध येत नसल्यानेच हे पाऊल त्यांनी उचलल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. मात्र एक डॉक्टर महिला केवळ अंगवार दूध येत नाही. ते बाळाला पाजता येत नाही या कारणाने आत्महत्या करते याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा तर्क लढवले जात आहे. त्यामुळे पोलिसही आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0 Comments