उद्यापासून नवरात्रोत्सव या सणाला सुरवात होत आहे. या काळात सर्व भाविक मनातील इच्छा-अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी देवीची आराधना करत उपवास करतात. याशिवाय बहुतांश घाटाचे देवीचा घट देखील बसवतात. तर काही भाविक नऊ दिवस उपवास धरून देवीची आराधना करतात. दरम्यान, नवरात्रोत्सवात उपवास करताना शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आता आपण यामागचं खरं कारण जाणून घेऊयात…
उपवास केल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो? :
हिंदू धर्मात धार्मिक भावनांना विशेष महत्व आहे. अनेक जण आत्म-नियंत्रण आणि दृढ इच्छाशक्ती असल्याने उपवास करतात. जर तुम्ही देखील अध्यात्मिक कारणांसाठी उपवास करत असाल, तर उपवास करताना शारीरिक संबंध ठेवणे अयोग्य मानलं जातं. कारण धार्मिक परंपरा आणि समुदायांच्या मते, उपवास करताना शारीरिक संबंध केल्यास तुमचं शरीर अपवित्र होतं असं म्हंटल जातं, त्यामुळे उपवासाच्या काळात लैंगिक संबंध ठेवणे अयोग्य मानलं जातं. मात्र यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे ते आपण जाणून घेऊयात.
वैज्ञानिकांच्या मते, उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत. कारण उपवास केल्याने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. याशिवाय अपचन यांसारख्या समस्येपासून सुटका होण्यास देखील मदत होते. तसेच उपवास केल्याने हृदयाचे आरोग्य व मेंदूचे कार्य देखील सुधारते. याशिवाय उपवास करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
उपवासादरम्यान शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? :
उपवास असल्यास शारीरिक संबंध ठेवणे अयोग्य आहे. कारण उपवास असल्यास शरीर कमकुवत होते. तसेच उपवास करताना तुम्ही अन्न आणि पाणी किंवा पेय पिणं टाळता, तेव्हा तुमचं शरीर फारच कमकुवत होते. यामुळे तुमच्या शरीराच्या ऊर्जा पातळीत देखील मोठ्या प्रमाणात घट होते.
तसेच शारीरिक संबंध ठेवताना शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. मात्र ऊर्जा खर्च झाल्याने कॅलरीज देखील बर्न होतात, पण आधीच शरीर कमकुवत असेल तर शारीरिक संबंध टाळण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो.
0 Comments