धाराशिव हादरले ! भावकीतील व्यक्तीकडून गर्भवतीवर अत्याचार


धाराशिव |

भावकीतीलच २५ वर्षीय विवाहित महिला गरोदर असल्याचे माहीत असूनही रात्री घरात शिरून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी वाशी तालुक्यातून समोर आली आहे. याप्रकरणी वाशी ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय पीडितेने बुधवारी वाशी ठाणे गाठून तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार, भावकीतीलच एक व्यक्ती लग्न झाल्यापासूनच तिच्याशी सलगी करू पाहत होता. तसेच सातत्याने तो माझ्यासोबत चल म्हणून मानसिक त्रास देत होता.

 दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता तो पीडितेच्या घरात शिरला. ती गरोदर असल्याचे माहीत असूनही आरोपीने तोंड दाबून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. यानंतर हा प्रकार घरात न सांगण्यावरून त्याने मारहाणही केली. यावेळी पीडितेचा पती वाचवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments