भातंबरेत शेतकरी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन


बार्शी |

बार्शी तालुक्यातील भातंबरे गावी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन आज शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गायकवाड यांनी शेतकऱ्यांना संघटित करून, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी लढा तीव्र करणार असल्याचे सांगून, सर्व शेतकऱ्यांना संघटनेची शपथ दिली.

 त्यावेळी गावातील महिलांसह, अमोल खुणे, तानाजी साळुंखे, अभिजीत खुणे, चंद्रकांत माळी, सुनील मेंढे, सादिक मुलानी, प्रकाश मोहिते, शंकर बेताळे, तात्या शिंदे, शिवाजी शिंदे, रामा माने, प्रल्हाद तांबे, तुकाराम खुणे, शंकर खुणे, विक्रम खुणे, बापू खुणे, गणेश पाटील, शशिकांत खुणे, दादासाहेब शिराळ, विलास तांबे, पांडुरंग खुणे, प्रतीक पाचपुते, दीपक खुणे, सचिन चव्हाण, राहुल पवार, नामदेव खुणे, रामेश्वर निकम, भय्या जाधव, सचिन पाटील, दिलीप पवार, संतोष खुणे, भीमा माळी, अर्जुन खुणे, श्रीनिवास खुणे, अरुण पवार, लक्ष्मण खुणे, श्रीराम खुणे, दत्तात्रय साळुंके, दशरथ जगदाळे, बाबा जाधव, बारकू माळी मनमंथ बेताळे आदींसह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर बेताळे यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल खूने यांनी करून, तानाजी साळुंखे यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments