महाराष्ट्र विद्यालयात सखी सावित्री समितीची सभा संपन्न



आज दिनांक ३० ऑगस्ट २०२४ वार शुक्रवार रोजी महाराष्ट्र विद्यालयामध्ये सखी सावित्री या समितीची सभा आयोजित करण्यात आली. या सभेचे प्रास्ताविक प्राचार्या के.डी.धावणे यांनी केले.

राज्यातील सर्व शाळेमधील मुला - मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समता मुलक वातावरण निर्मितीसाठी शाळा स्तरावर सखी सावित्री समिती गटन करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र विद्यालय बार्शी या ठिकाणी सखी सावित्री या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
 संस्थेचे सचिव पी.टी. पाटील हे सखी सावित्री समितीचे अध्यक्ष आहेत. समितीच्या सचिव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.डी.धावणे, सदस्य पुढील प्रमाणे आहेत नगराध्यक्ष रमेश पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ सुनिता देशमुख, नगरसेविका सौ योजना पवार, सहशिक्षका श्रीमती एस.जी.कातळे, महिला पालक प्रतिनिधी सौ विद्या भोरे, विद्यार्थी प्रतिनिधी चि हर्ष सुरवसे व चि समर्थ राऊत,विद्यार्थिनी प्रतिनिधी कु विश्वभारती अंधारे व कु मनस्वी भोसले.
मुला- मुलींना घर, शाळा आणि समाजात सुरक्षित बालस्नेही वातावरण मिळावे तसेच त्यांचे सामाजिक भावनिक ,अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी शाळेमध्ये सखी सावित्री समितीचे स्थापन करण्यात आलेली आहे.

ही समिती विद्यालयातील सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणार आहे तसेच विद्यालयात किंवा विद्यालयाच्या परिसरात जर काही चुकीचं घडत असेल तरीदेखील ही समिती त्या गोष्टीची जाणीव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांना तात्काळ करून देणार आहे. विद्यालयात एखादी चांगली गोष्टी  राबवण्याबद्दल देखील ही समती आपले मत मांडेल. विद्यार्थी प्रतिनिधी शाळेमधील आपल्या मित्र मैत्रिणीच्या समस्या किंवा एखादी भौतिक सुविधेची अडचण याच्या विषयी आपले मत मांडू शकतील. 
ही समिती प्रामुख्याने मुला-मुलींच्या अडचणी, समस्या या वर कार्य करणार आहे.

या सभेमध्ये डॉ.सुनिता देशमुख व विद्या भोरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या समितीचे काम किती महत्वाचे आहे हे आपल्या मनोगतामध्ये संस्थेचे सचिव तथा सखी सावित्री समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील यांनी सांगितले. या सभे नंतर शाळा व्यवस्थापन व विकास आराखडा समितीची सभा देखिल संपन्न झाली.
या दोन्ही सभेचे सूत्रसंचालन आनंद कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. सी. महामुनी यांनी केले.

Post a Comment

0 Comments