महायुतीत वादाची ठिणगी; तुळजापूरात भाजपच्या जागेवर शिवसेनेचा दावा



धाराशिव |

विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांत सध्या लगीनघाई सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी जोरात सुरु असताना महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरु झाली आहे.

त्यातच तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या विधानावरून येत्या काळात महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहीजे ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती तशी माझी देखील आहे. म्हणून मी तुळजापूरची जागा ही शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे. 

दरम्यान कदमांच्या या दाव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. याठिकाणी माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील हे आमदार आहेत. ही जागा आता शिवसेनेकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना तानाजी सावंत यांनीही जिल्ह्यातील चारही मतदारसंघावर दावा केला होता.

Post a Comment

0 Comments