ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा महागलं, 10 ग्रॅमसाठी आता..


ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. सोन्याने दोनच दिवसांत दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. बजेटनंतर पहिल्यांदाच दोन्ही धातूत विक्रमी भाववाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे.

29 जुलै रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. मंगळवारी त्यात 210 रुपयांची घसरण झाली. 31 जुलै रोजी सोन्याने 870 रुपयांची विक्रमी भरारी घेतली. तर, ऑगस्टच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या किमती रॉकेटच्या तेजीने वाढल्या आहेत.

सोने-चांदीच्या किमती
1 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतींनी 540 रुपयांची मुसंडी मारली. तर, आज सकाळी सुद्धा दरवाढीचे संकेत दिसून आले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 64,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,051 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदीने देखील तूफान फटकेबाजी केली आहे. 31 जुलै रोजी चांदीने 2 हजारांची भरारी घेतली. 1 ऑगस्ट रोजी चांदीत 600 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,721, 23 कॅरेट 69,442, 22 कॅरेट सोने 63,864 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,291 रुपये, 14 कॅरेट सोने 40,787 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत.

घरबसल्या जाणून घ्या भाव-
दरम्यान, तुम्ही सोने आणि चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Post a Comment

0 Comments