माध्य.शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते महावाचन उत्सवाचे उद्घाटन



महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षण महावाचन सप्ताह २०२४ या उपक्रमाचे औचित्य साधून या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन माननीय सचिन जगताप माध्य.शिक्षणाधिकारी जि.प. सोलापूर यांच्या हस्ते महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील ग्रंथालय विभागात संपन्न झाले.

याप्रसंगी सचिन जगताप यांनी  महाराष्ट्रातील महावाचन चळवळ ह्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.हा उपक्रम २२ जुलै २०२४ ते दिनांक २८ जुलै २०२४ दरम्यान महावाचन उत्सव - २०२४ म्हणून राबविण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत असे ते म्हणाले.सदर उपक्रमांमध्ये  राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी तील सर्व विद्यार्थ्यांनी  या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी व इयत्ता ९ वी ते १२ वी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात आलेली आहे.

तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे,विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे,मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांशी नाळ जोडणे,दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परीचय करुन देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देणे,विद्यार्थ्याच्या सृजनशीलता व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत असे त्यांनी सांगितले. हा शैक्षणिक सप्ताह २२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ यादरम्यान पार पडेल. 

यामध्ये २२ जुलै या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा केला जाईल,२३ जुलैला मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस साजरा केला जाईल,२४ जुलैला क्रीडा दिवस साजरा केला जाईल, २५ जुलैला सांस्कृतिक दिवस साजरा केला जाईल २६ जुलैला कौशल्य डिजिटल उपक्रम दिवस साजरा केला जाईल,२७ जुलैला मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम व शालेय पोषण दिवस साजरा केला जाईल,२८ जुलैला समुदाय सहभाग दिवस साजरा केला जाईल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मा.सचिन जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला प्रोत्साहित करणारी विविध प्रकारची पुस्तके, तसेच आपले बौद्धिक ज्ञान वाढवणारी पुस्तके वाचावीत असे सांगितले. वाचनाने विचार वाढतो, जगात जेवढे काही थोर महापुरुष होऊन गेले त्यांचा इतिहास पाहता त्या सर्वांना वाचण्याची खूप आवड होती त्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी त्यांच्या जीवनातील उंच शिखर गाठले तुम्ही देखील तुमच्या जीवनात खूप वाचन करून यशस्वी व्हावे अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपल्या जीवनात पुस्तके हेच खरे मित्र असतात हे देखील सांगितले.
याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाने लिखाणाची आवड निर्माण होत असते आणि या लिखाणातून साहित्य निर्माण होत असते आणि होणारं साहित्य हे आपल्याला पुढील सत्रात सर्वांच्या पुढे मांडण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करत आहोत या संमेलनात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे शिक्षणाधिकाऱ्यांनी आवाहन केले.
 
याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी.महामुनी,पर्यवेक्षिका एन.बी.साठे, ग्रंथपाल एम.बी. मिरगणे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments