संभाजीनगर हादरलं ! नवरा मैत्रिणीसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात बायकोने पाहिलं अन्



 छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पती आणि त्याच्या मैत्रिणीला रोमान्स करताना रंगेहाथ पकडलं. इतकंच नाही तर,या दृष्यानंतर पत्नीने सदर महिलेला थेट घराच्या गेटला बांधून मारहाण केली आहे.

या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद देखील करण्यात आली आहे. या घटनेची आता जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

बायकोने नवऱ्याला मैत्रिणीसोबत रंगेहाथ पकडलं
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमधील वाळूज परिसरात एक व्यक्ती पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. हा व्यक्ती वाळूज परिसरातील एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. याच दरम्यान त्याची ओळख एका महिलेशी झाली.

यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचे. हा वाद तीन महिन्यांपुर्वी फारच विकोपाला गेला. त्यामुळे या व्यक्तीने पत्नी आणि आपल्या मुलांनाच घरातून काढून दिले. त्यांचा एक मुलगा हा पुण्याला तर दुसरा मुलगा हा हैद्राबादला राहू लागला. तर पत्नी ही माहेरी गेली.

अशात सदर व्यक्ती घरी एकटाच राहत होता. त्याने नुकतेच ओळख झालेल्या महिलेला घरी बोलावले होते. पण, त्याचवेळी त्याची पत्नी भावाला भेटण्यासाठी वाळूज येथे आली होती. तिने भावासोबत घरी जाण्याचा निर्णय घेतला. तिने घरी जाऊन बघितले असता पती महिलेसोबत रोमान्स करताना दिसून आला.

सगळं दृश्य बघून या महिलेने पतीसोबत असलेल्या महिलेला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर, त्या महिलेला गेटला बांधून ठेवले. सर्व प्रकार पाहून परिसरात बघ्याची एकच गर्दी जमली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Post a Comment

0 Comments