भाजपचे काही खासदार धक्का देण्याच्या तयारीत? केंद्रातील सरकार अडचणीत येणार



लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत न मिळाल्याने भाजपची संपूर्ण मदार ही एनडीएमधील घटक पक्षांवर आहे. भाजपने घटक पक्षांच्या मदतीने बहुमत मिळवत केंद्रात पुन्हा एनडीए सरकार स्थापन झाले आहे.

सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आहेत. पण घटक पक्षांच्या टेकूवर उभे असलेले भाजपप्रणित एनडीए सरकारमध्ये राजकीय भूकंप होणार, असा दावा करण्यात आला आहे.

केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला एनडीएमधील घटक पक्ष टीडीपी आणि जेडीयू सारख्या पक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची कामगिरी चांगली झाली नाही तिथे पक्षाची चिंता वाढली आहे. तेथील खासदारांनी पक्ष बदलला तर… ही चिंता भाजपला सतावत आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments