माढा लोकसभा मतदारसंघात मतदारांनी भाकरी फिरवली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील तीन तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे. तर रणजितसिंह निंबाळकरांनी तीन तालुक्यात मताधिक्य मिळालं आहे. मात्र, निंबाळकरांना मिळालेलं मताधिक्य अल्प प्रमाणात आहे.
विशेष म्हणजे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या शिंदे बुंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांना आघाडी मिळाली आहे. माढा आणि करमाळा तालुक्यात मोहिते पाटलांनी मोठं मताधिक्य मिळालं आहे. माढ्यात मोहिते पाटलांना 50000 हून अधिकचा लीड मोहिते पाटलांनी मिळाला आहे. तर करमाळा मतदारसंघातून 41000 हून अधिकचा लीड त्यांना मिळाला आहे.
0 Comments