पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला उडवलं; पुढं जे झालं ते..


पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस पाटलाची  अल्पवयीन मुलगी चालवत असलेल्या मालवाहू पिकअपने धडक दिल्यानं एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की पिकअपने दुचाकीला 20 ते 30 फूट फरफटत नेलं.यामध्ये 30 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पाटलाची 15 वर्षाची मुलगी मालवाहू पिकअप चालवत होती. यावेळी तिच्या शेजारी तिचे वडील देखील बसलेले होते. अशात मुलीने समोरून येणाऱ्या एका दुचाकीला धडक दिली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची (Pune News )अल्पवयीन मुलगी पिकअप क्रमांक एम एच 12 एस एफ 3439 चालवत होती. सोबत वडील असताना तीने जोरात पिकअप चालवला.यामुळे समोरून येणारी दुचाकीला धडक लागली.

अपघात प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धडक दिल्यानंतर दुचाकी 20 ते 30 फुट फरफटत गेली. तरुण मुलाच्या जागीच मृत्यू झाल्याने या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील अल्पवयीन मुलाने काही दिवसांपूर्वीच नशेत कार चालवत दोघांना उडवलं होतं.

या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू असतानाच ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जातोय.

Post a Comment

0 Comments