सुशिलकुमार शिंदे यांचा नातू करतोय जान्हवी कपूर, अशी आली माहिती समोर



मुंबई |

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकमेकांना डेट करत असल्याची गोष्ट जगजाहीर आहे. या दोघांनी माध्यमांसमोर कधीच जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली नाही. मात्र आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जेव्हा जान्हवीने सारा अली खानसोबत हजेरी लावली, तेव्हा तिने पहिल्यांदा शिखरसोबतच्या नात्याविषयी हिंट दिली. करणच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना तिने शिखरचं नाव घेतलं होतं. या दोघांना अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये किंवा ट्रिपदरम्यान एकत्र पाहिलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर एका कार्यक्रमात जान्हवीने शिखरच्या नावाचा नेकलेससुद्धा गळ्यात घातला होता. तर काही दिवसांपूर्वी शिखरच्या आईसोबत ती सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती.

शिखर पहाडिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.

Post a Comment

0 Comments