मुंबई |
अहमदनगर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलीये. महायुतीकडून भाजपचे नेते सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आलीये. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापलंय. अशात निलेश लंकेंनी मोठा डाव टाकत सुजय विखेंची कोंडी केल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू आहेत.
निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. निलेश लंके यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याबाबत स्वत: लंकेंनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आदरणीय अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. अण्णांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत सामाजिक व राजकिय परस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचंही लंके यांनी या भेटीनंतर म्हटलं आहे
अण्णांना मानणारा मोठा वर्ग अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे, निलेश लंकेंनी अण्णांची भेट घेऊन विखेंची कोडी करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लंकेंनी घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांआधी सुजय विखे यांनी एका सभेमध्ये तुतारी वाजवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर नगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्या बाजूनं वातावरण फिरलं असल्याच्या चर्चा आहेत. सध्या नगर लोकसभेत निलेश लंके यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
0 Comments