पुणे |
तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर आज दिवसा भरचौकात चार ते पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला.त
या हल्ल्यातून तहसीलदार आणि त्यांचे चालक सुदैवाने बचावले. दरम्यान याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
तहसीलदार पाटील हे शहरातील जुन्या पुणे-सोलापूर मार्गावरून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शासकीय वाहनातून आपल्या कार्यालयाकडे जात होते. त्यांची गाडी संविधान चौकात आली असताना पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टापून, लोखंडी रॉड, गज याने हल्ला केला. त्यांनी गाडीच्या काचा लोखंडी गजाने पह्डल्या. सुदैवाने या हल्ल्यातून तहसीलदार पाटील व त्यांचे चालक मल्हारी मखरे बचावले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची इंदापूर तालुक्याची ही दुसरी टर्म असून त्यांनी अवैध धंदे, विशेषतः वाळूमाफिया यांच्यावर चाप बसविला आहे. त्यातून त्यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments