कंगना रणौत बॉलीवूडला रामराम ठोकणार? मोठी घोषणा


मुंबई |

 बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणुकीसाठी मंडी मतदारसंघातून उभी राहिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिच्यावर भाजपने ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सध्या कंगना रणौत पूर्णवेळ प्रचाराच्या कामात गुंतलेली दिसत आहे. तिच्या हिमाचल प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात प्रचार सभा पार पडत आहेत. यंदाच्या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वासही कंगना रणौतने व्यक्त केला आहे.

अशातच आता कंगना रणौतने एक मोठी घोषणा केली आहे. माध्यमांशी बोलताना, “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले तर बॉलीवूड सोडेल आणि पूर्णवेळ राजकारण करेल” असे कंगना रणौतने सांगितले आहे. त्यामुळे कंगना रणौतसाठी लोकसभा निवडणुकीत विजय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मुलाखतीत कंगना रणौला प्रश्न विचारण्यात आला होता की, ती सिनेमा आणि राजकारण एकत्र कसं मॅनेज करेल?. याचं प्रश्नाचे उत्तर देताना तिने आपण जिंकून आल्यास बॉलीवूड सोडेल, असे सांगितले आहे.

कंगना रणौत म्हणाली की, “मी चित्रपटांमध्येही बोर होते. मी रोलही करते आणि दिग्दर्शनही करते. पुढे जाऊन जर मला राजकारणामध्ये करिअर दिसलं तर मग मी राजकारणच करेल. मला वाटतं की, लोकांना माझी गरज आहे. लोक माझ्याशी जोडले गेले तर मग मी त्याच दिशेने काम करेन. मी जर मंडी लोकसभा जिंकले तर मी राजकारणात जाईन. मला अनेकजण सांगतात की राजकारणात जाऊ नको. पण तुम्हाला जर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर राजकारणात यावं लागेल”

त्याचबरोबर, कुठे ना कुठे आपण घराणेशाहीला राजकारण आणि चित्रपटापुरत मर्यादित ठेवलं आहे. घराणेशाही ही सगळ्यांचीच समस्या आहे आणि असलीच पाहिजे. या सगळ्यातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे. आज मंडी मतदारसंघ माझा परिवार झाला आहे. लोक मला ‘मंडी की बेटी’ म्हणून हाक मारत आहेत. हे माझं कुटुंब आहे. त्यामुळे आता भावनेच्या आहारी नाही गेलं पाहिजे.” असे ही कंगना रणौत ने म्हणले आहे.

Post a Comment

0 Comments