माळशिरस |
आमदार राम सातपुते यांनी रोज पैसे आणि पैसे दुसरा विशेष त्यांनी केला नाही म्हणून सातपुते माळशिरस तालुक्यातून पळून गेला असल्याचा हल्लाबोल उत्तम जानकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी दिलेल्या मुलाखतीतून राम सातपुते यांची पोलखोल केली आहे.
जानकर पुढे बोलताना म्हणाले की, राम सातपुते हा देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेला त्यांचा एक कामगार होता, त्याच्या हातून पैसे वाटले ते सरकारचे पैसे होते. राम सातपुतेंच्या हप्ते वसुलीमुळे सर्व अधिकारी बेजार होऊन गेले होते.
माळशिरस तालुक्यामध्ये तहसीलदार, फॉरेस्ट ऑफिसर, बांधकाम विभाग आदी विभागातील अधिकारी राम सातपुते यांच्या हप्तेखोरी मुळे कंटाळून इतरत्र बदली करून घेत आहेत.
माळशिरस मधून पळून जाऊन तो आता लोकसभा निवडणूक लढवत आहे तो सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही तर त्याला देशभर पाठवून हिंदुत्ववाद्याचा प्रचार करण्यासाठी यासाठी खासदार व्हायचे असल्याचे जानकर यांनी सांगितले. रामाला मानणारा हा बनावट राम खोटा, लबाड,भ्रष्टाचारी असून फक्त पैसे खाण्यासाठी नेमलेला तो एक कामगार आहे.
आता बीडचे पार्सल बीडला पाठवायचे आहे. त्यांनी काही जणांचे ऑपरेशन करून दिखावा केला व हॉस्पिटलकडून हप्ते घेऊ लागला असा घणाघात देखील जानकर यांनी केला.
0 Comments