सैफ अली खान तिसरी बायको आणण्याच्या तयारीत!, करिना कपूरसोबत संबंध बिघडले?


बॉलीवुडमध्ये सध्या अनेक सेलेब्रिटी लग्न करत आहेत. यासोबतच काहींचे वर्षांचे संसार तुटत आहेत. इतक्या दिवस बच्चन कुटुंब चर्चेत होतं. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात काहीतरी बिनसल्याचं बऱ्याच दिवसांपासून म्हटलं जात होतं. लवकरच ते घटस्फोट घेणार, इथपर्यंत या चर्चा होत्या.

ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांनी कधीच याबाबत बोलून दाखवलं नाही. तसंच ऐश्वर्या बऱ्याच ठिकाणी कुटुंबियांसोबत दिसून आली.त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम मिळाला. आता ऐश्वर्या नाही तर करीना कपूरच्या वैवाहिक आयुष्याबाबत बोललं जातंय. सैफ आणि करीना यांच्या आयुष्यात वादळ आल्याची जोरदार चर्चा सध्या रंगत आहे.

सैफचे करिना कपूरसोबत संबंध बिघडले?
इतकंच नाही तर, सैफ लवकरच तिसऱ्या बायकोच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जातंय. यामुळे करीनाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक, सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना ओळखलं जातं. अलीकडेच सैफ आणि करीना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

यामध्ये दोघे त्यांच्या इमारतीखाली लिप लॉक करताना दिसत होते. मात्र, या व्हिडिओमुळे सैफ आणि करीना कपूर ट्रोल देखील झाले. यानंतर सैफचा अजून एक व्हिडिओ आणि फोटो समोर आला, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत.

व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

झालं असं की, काही वर्षांपुर्वी सैफने आपल्या हातावर करीनाच्या नावाचा टॅटू काढला होता. मात्र, आता नुकत्याच व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सैफने करीनाच्या नावाचा टॅटू काढून टाकल्याचं दिसतंय. हेच नाही तर करीनाच्या नावाऐवजी तिथे आता वेगळाच टॅटू दिसत आहे. यामुळे चाहते हैराण झाले आहेत.

अचानक सैफने करीनाच्या नावाचा टॅटू हातावरून काढल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अनेकांचे म्हणणे आहे की, चित्रपटासाठी त्याने तो टॅटू कव्हर करून घेतलाय. अजून एकाने म्हटले की, बहुतेक यांच्यामध्ये वाद झाला वाटतं, त्यामुळे सैफने करीनाच्या नावाचा टॅटू काढून टाकला. दुसरा एक युझर म्हणाला की, आता टॅटू  नवीन काढला, लवकरच बायकोही नवीन आणणार. अशा प्रतिक्रिया या फोटोवर उमटत आहेत. इथूनच या घटस्फोटाच्या चर्चा देखील सुरू झाल्या.

दरम्यान, अनेक वर्षे डेट केल्यानंतर सैफ अली खान याच्यासोबत 16 ऑक्टोबर 2012 रोजी करीनाने लग्न केले. त्यांना तैमूर अली खान आणि जेह ही दोन मुले आहेत. दोघेही सुखी संसार करत आहेत. दोघेही आपल्या आगामी प्रोजेक्ट वर काम करत आहेत.

Post a Comment

0 Comments